1 मे रोजी शाळांमध्ये ध्वजारोहण नाही

राष्ट्रध्वज

नाशिक : महाराष्ट्र दिन म्हणजेच येत्या 1 मे रोजी शाळा, महाविद्यालयांत ध्वजारोहण करु नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 3 मेपर्यंत देशात लॉकडाऊन लागू राहणार आहे. त्यामुळे ध्वजारोहणासाठी शाळेत न येण्याच्या सूचना त्यांनी केल्या. खासगी शिक्षण संस्था, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनाही हा आदेश लागू असल्यामुळे त्यांनाही ध्वजारोहण करता येणार नाही.

First Published on: April 23, 2020 6:43 PM
Exit mobile version