पोलीस मुख्यालयात घुसखोरी; एटीएम मशीनसह सीसीटीव्ही फोडले

पोलीस मुख्यालयात घुसखोरी; एटीएम मशीनसह सीसीटीव्ही फोडले

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला जिवंत जाळले

आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या आवारात घुसखोरी करत चोरट्याने एसबीआयचे एटीएम मशीन आणि सीसीटीव्ही फोडल्याची घटना शुक्रवारी घडली. हा चोरटा तब्बल दोन तास एटीएममध्ये असतानाही पोलिसांना त्याचा सुगावा लागला नसल्याने पोलिसांचे मुख्यालयदेखील सुरक्षित नसल्याचे पुढे आले आहे.

नाशिक शहरात घरफोडी व चोरीचे सत्र सुरुच आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच ही घटना घडली आहे. शुक्रवारी (ता.१०) पहाटे पोलिसांनाच आव्हान देत चोरट्याने एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी शॉपिंग कॉप्लेक्स उभारलेले आहे. मुख्यालय परिसरात राहणार्‍या कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी शाळा आणि एसबीआयचे एटीएमची अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याच एटीएमला लक्ष करत चोरट्याने शुक्रवारी (ता.१०) पहाटे एटीएमचा वरचा भाग तोडण्याचा प्रयत्न केला. रोकड खालच्या कप्प्यात असल्याने मूळ कप्पा तुटला नाही. चोरटा तब्बल दोन तास एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

First Published on: May 11, 2019 5:10 PM
Exit mobile version