10 एप्रिलपर्यंत नाशिक लॉकडाऊनचा विचार

नाशिक : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये मुख्यमंत्री लॉकडाऊन घोषित करण्याची शक्यता आहे. यात नाशिक शहराचा समावेश होत असून, 10 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात निर्बंध अधिक कडक केले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. यात जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. त्यामुळे प्रशासन लॉकडाऊन करण्याच्या विचारात असले तरी, राजकीय पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. यातूनच राज्यात निर्बंध अधिक कडक करण्याचे विचार सुरु असल्याने मुख्यमंत्री आज काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

अन्यथा 2 तारखेला निर्णय
राज्यात आज लॉकडाऊन बाबत काही निर्णय न झाल्यास येत्या शुक्रवारी (दि.2) पालकमंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये येणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेवून त्यानंतर ते लॉकडाऊबाबत निर्णय घेणार आहेत.

First Published on: March 31, 2021 3:33 PM
Exit mobile version