आईशेजारी खेळताना बिबट्याची झडप; तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

आईशेजारी खेळताना बिबट्याची झडप; तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

इगतपुरी तालुक्यात तीन वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. इगतपुरी वनपरिक्षेत्रातील भंडारदरा रस्त्यावरील खेड गावाजवळील मौजे काननवाडीमध्ये मंगळवारी (दि.२२) सायंकाळी सात वाजेदरम्यान घरासमोरुन तीन वर्षीय चिमुकलीला आईच्या समोर उचलून फरफटत नेले होते. या घटनेने खळबळ उडाली आहे. गौरी गुरुनाथ खडके असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

भंडारदरा रस्त्यावरील काननवाडी गावातील गट क्रमांक २५३ मधील खडके कुटुंबियांच्या घरासमोर बिबट्या आला. बिबट्याने झडप घालत आईशेजारी बसलेल्या चिमुकलीला जबड्यात उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. कुटुंबियांनी आरडाओरड सुरु करत काठ्या, बॅटरी घेत बिबट्या पळाल्या. त्या दिशेने कुटुंबियांनी चिमुकलीचा शोध सुरु केला. ती जंगलात कुटुंबियांना सापडली. त्यावेळी ती गंभीर जखली झाली होती. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल महेंद्र पाटील कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर विनविभागाचे कर्मचारी गस्त घालत होते. जखमी चिमुकलीला सुरुवातील घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना तिचा बुधवारी (दि.२३) दुपारी मृत्यू झाला. भंडारदराकडे जाणारे रस्ते जंगलातून जातात. या भागात बिबट्यांचा संचार आहे. बिबट्या हल्ले करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

First Published on: June 23, 2021 11:29 AM
Exit mobile version