पर्यटकांना खुणावतोय भिवतास धबधबा

पर्यटकांना खुणावतोय भिवतास धबधबा

नाशिक जिल्ह्याला निर्सगाने भरभरून निर्सग सौंदर्य दिले आहे त्यापैकीच एक नैसर्गिक देणगी म्हणजेच सुरगाणा तालुक्यातील केळावण- खोकरविहीर सिमेवर असलेला नयनरम्य भिवतास धबधबा, मान्सुनचे आगमन होताच हा धबधबा वाहण्यास सुरूवात होते. त्याच बरोबर सदरचा परिसरही अतिशय सुंदर आणि मनमोहक रुप धारण करतो. हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि अप्रतिम निर्सग सौंदर्याचा आनंद लुटत असतात. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील हा भिवतास धबधबा अतिशय सुरेख आणि सुंदर आहे. उंचावरून पडणारे पांढरेशुभ्र पाणी अतिशय मनमोहक दिसत असते. धबधब्याच्या खालचा परिसरही अतिशय सुंदर आहे. येथील परेटी डोह, हंडाहंडी डोह अतिशय सुंदर असून, दोन्ही बाजूचा परिसर अतिशय नयनरम्य आहे.

परंतु या आदिवासी भागातील धबधब्याच्या परिसराचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही, दरवर्षी या धबधब्याचे पाणी कुठल्याही कामावीणा वाहून जात असते. जर प्रशासन आणि लोकप्रतिनींनी या अप्रतिम निर्सगाचा ठेवा असलेल्या धबधब्याकडे लक्ष देऊन सुधारणा केली तर सदर परिसर सुजलाम् सुफलाम् होऊन एक सुंदर असे पर्यटन स्थळ होऊन परिसरातील नागरिकांना रोजगार निर्मिती होईल, अशी मागणी होत आहे.

First Published on: June 29, 2021 10:00 AM
Exit mobile version