नाशिककरांची कोंडी सुटणार; मायको सर्कल, रविवार कारंजा परिसरात उड्डाणपूल

नाशिककरांची कोंडी सुटणार; मायको सर्कल, रविवार कारंजा परिसरात उड्डाणपूल

नाशिक शहर

मायको सर्कल आणि रविवार कारंजा परिसरात उड्डाणपूल, तांबट घाट आणि नागरे नर्सरीजवळील रस्त्यावर पूल, कृषीनगर येथे ९०० मीटर लांबीचा सायकल ट्रॅक, पंचवटी, गंगापूर रोड आणि नाशिकरोडला नाट्यगृह, पंचवटीत महिलांसाठी उद्योग भवन, पेलिकन पार्कच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आदी महत्वपूर्ण प्रस्तावांच्या तरतूदींचा समावेश असलेले व १ हजार ८९३ कोटी ६४ लाख रुपयांचे महापालिकेचे अंदाजपत्र आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी ११ फेब्रुवारीला स्थायी समितीसमोर सादर केले. कोणतीही करवाढ नसलेल्या या अंदाजपत्रकाचे स्वरूप पाहता हे ‘इलेक्शन बजेट’ असल्याचे स्पष्ट होते. अंदाजपत्रक स्थायी सभापती हिमगौरी आहेर- आडके यांनी दुरुस्तीसह मंजूर केले. आता ते महासभेवर चर्चेसाठी सादर होणार आहे.

एखाद्या राजकीय पुढार्‍याला शोभेसे असे अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अंदाजपत्रक असल्याने त्यावर भाजपची छाप असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. महत्वाचे म्हणजे शिळ्या कढीला उत देत दीर्घ कालावधीनंतर एकदा पुन्हा एकदा रविवार कारंजा परिसरातील उड्डाणपुलाचा प्रस्ताव अंदाजपत्रकाव्दारे मांडण्यात आला आहे. भाजप नेते विजय साने स्थायी समितीचे सभापती असतानाही हा विषय मंजूर झाला होता; परंतु व्यापारी वर्गाने जोरादार विरोध केल्याने तो प्रस्ताव बारगळा. त्यानंतर मनसेच्या सत्ताकाळात तत्कालीन महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी उड्डाणपुलाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्यावेळी देखील विरोध झाला. असे असताना आता आयुक्तांनी हा प्रस्ताव मांडून विरोध ओढावून घेतला आहे.

३५१ कोटींचा स्पील ओव्हर

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी २२७.९२ कोटी रुपयांच्या आरंभीच्या शिलकीचे अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले. यात भांडवली खर्च आणि निविदा स्तरावरील कामे लक्षात घेता ३५१ कोटींच्या बंधनात्मक दायित्वाचे (स्पील ओव्हर) चे आव्हान आयुक्तांना यंदा पेलावे लागणार आहे. यामुळे झिरो स्पील ओव्हरचे आयुक्तांचे स्वप्नही धुळीस मिळाले आहे.

टीडीआरसाठी ५ टक्के शुल्क

विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार यंदा अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक प्रिमीयम एफएसआय तसेच रस्ता रुंदीनुसार वाढीव टीडीआर व वाढीव एफएसआय देण्यात येणार आहे. टीडीआर वापराकरता ५ टक्के पायाभूत सुविधा शुल्क लागू करण्यात आले आहे.

नाशिकला नवीन आर्थिक वर्षात हे मिळणार

First Published on: February 22, 2019 9:50 AM
Exit mobile version