दोन किलोमीटरचा फेरा अन् उघड्यावर लघुशंका

दोन किलोमीटरचा फेरा अन् उघड्यावर लघुशंका

लघुशंकेसाठी सभास्थळी आलेल्यांना सुमारे दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. गाडी पार्किंग करुन सभास्थळापर्यंत पोहोचताना रस्त्यात काही कार्यकर्त्यांना लघुशंका लागल्याने त्यांनी थेट उघड्यावर लघूशंका करत मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प ‘स्वच्छ भारत अभियाना’ला हरताळ फासल्याचे दिसून आले.

पिंपळगाव बसवंत येथील नवीन बाजार समितीच्या मोकळ्या जागेचे सपाटीकरण करुन भव्य मंडप उभारण्यात आला. भर उन्हात पांढर्‍या मंडपाचा कार्यकर्त्यांना आधार मिळला तरी, सुरक्षेच्या कारणास्तव पाण्याची बाटलीदेखील घेऊन जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी प्लॅस्टीकच्या बाटल्यांचे ढीग साचले होते. तसेच या बॉटल रिकाम्या केलेल्या कार्यकर्त्यांनी उघड्यावरच लघुशंका सुरू केल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचे भरदिवसा धिंडवडे निघाले.

अखेरपर्यंत सापांची भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी युतीचे उमेदवार व स्थानिक आमदारांनी भाषण ठोकले. पण त्यांच्या भाषणाच्या वेळी सभामंडपात काहीतरी गोंधळ होत राहिला. साप निघाल्याची शंका उपस्थित करून कार्यकर्ते जागेवर उभे राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे सभामंडपात साप निघतो की काय, अशी धास्ती उमेदवारांसह आयोजकांना वाटून गेली. अखेर मोदींचे भाषण सुरू झाल्यानंतर आयोजकांना हायसे वाटले आणि त्यांचे भाषण संपताच जीव भांड्यात पडल्याची अनुभूती घेतली. मोदींची सभा घेण्यापूर्वीपासून सापने निर्माण केलेली भिती अखेरपर्यंत दिसून आली.

First Published on: April 22, 2019 11:05 PM
Exit mobile version