इंदिरानगरातील व्यावसायिकाच्या लूटमार व हत्येप्रकरणी दोन संशयितांना अटक

इंदिरानगरातील व्यावसायिकाच्या लूटमार व हत्येप्रकरणी दोन संशयितांना अटक

प्रातिनिधीक फोटो

या खूनप्रकरणातील चिमा नाना पवार (सध्या रा. फुलेनगर, पंचवटी, मूळ रा. धामणगांव आवारी, ता.अकोले, जि. अहमदनगर), सुनील रामचंद्र पवार (रा. शाहूनगर, कॅनल रोड झोपडपट्टी, फुलेनगर, पेठरोड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. इंदिरानगर येथील बापू बंगला परिसरातील ‘सुपर ग्राहक बाजार’चे संचालक अविनाश महादू शिंदे (३५) यांच्यावर मंगळवारी (दि.८) रात्री दोन हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अविनाश यांच्याकडील ६ लाख रुपयांची रोकड असेलेली बॅग हिसकावत हल्लेखोर पसार झाले होते. सर्व बाजूने तपास करून ही आरोपींचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांनी तांत्रिक बाबींची पडताळणी करत त्यादृष्टीने तपास सुरू केला. अखेर गुन्हे शाखा युनिट – १ चे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाने अखेर संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

आपलं महानगरची नाशिक आवृत्ती १८ जानेवारी पासून सुरु
First Published on: January 16, 2019 7:59 PM
Exit mobile version