तोतया पोलिसास २ वर्षांची शिक्षा

तोतया पोलिसास २ वर्षांची शिक्षा

प्रातिनिधिक फोटो

पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून मोबाईल खरेदी करणार्‍याला न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा, १ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा सुनावली. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. नाईक यांनी ही शिक्षा सुनावली. सचिन अरून आचार्य असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

८ जुलै २०१८ रोजी नाशिक तालुका पोलीस ठाण्याजवळ सचिन आचार्य याने पोलीस उपनिरीक्षक निंबाकर कांबळे असल्याचे भासवून बबलू कैलास राठोड यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. तुमचा मोबाईल खरेदी करायचा असल्याचे सांगत तालुका पोलीस ठाण्याच्या गेटवर बोलवून घेतले. त्या ठिकाणी एकाला मोबाईल घेण्यासाठी पाठवले. त्यांच्याकडे मोबाईल देण्यास सांगितले. मी वडिलांकडून पैसे घेवून येतो, असे सांगत फरार झाला. याप्रकरणी राठोड यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी तपास करत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गुरुवारी (ता.१८) मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. नाईक निंबाळकर यांनी साक्षीदार, फिर्यादी, पंच, पुराव्यास अनुसरून आरोपीला २ वर्षांची शिक्षा, १ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्यांची साधा कारावास सुनावला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एस. पी. बंगले व टी. ए. त्र्यंबकवाला यांनी काम पाहिले.

First Published on: July 18, 2019 8:18 PM
Exit mobile version