अशी हि अनोखी फ्रेंडशिप

अशी हि अनोखी फ्रेंडशिप

निफाड तालुक्यातील सावळी गावात शेतकऱ्याने घरात दिली जागा बैलाला

पुरामुळे बैलांचा गोठा वाहून गेल्याने त्याच्या मालकाने घरात त्यांना जागा देऊन आज अनोखा फ्रेन्डशिप डे साजरा केला. नाशिक जिल्ह्यात सगळीकडे पुराचे थैमान चालू आहे. निफाड तालुक्यातील सावळी या गावाला गोदावरीच्या पुराने चारही बाजूने वेढले असून शेतकऱ्यांच्या मळ्यामळ्यांमध्ये पाणी साचले आहे. यामध्ये सायखेडा चांदोरी परिसरात भरपूर प्रमाणात पाणी साचले असून गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचले असून गोठे शेती आदी ठिकाणी जनावरांच्या निवाऱ्याचा देखील प्रश्न उभा राहिला आहे.

यातच सावळी गावातील शेतकरी पुंडलिक हरी बुटे यांनी आपल्या बैलांना आपल्या घरामध्ये बांधून बैलाचे एक प्रकारे ऋणच फेडले आहे. वर्षभर हा बैल आपल्यासाठी राब राब राबतो त्यांच्यासाठी पोळा सणाची वाट न बघता आजच त्यांच्याप्रती निष्ठा दाखवून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. गावामध्ये त्यांच्या या कार्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.

First Published on: August 4, 2019 4:51 PM
Exit mobile version