कलाशिक्षक देविदास हिरे यांचे अनोखे फलक

कलाशिक्षक देविदास हिरे यांचे अनोखे फलक

चांदवड : तालुक्यातील ‘शिक्षण मंडळ भगूर संचालित’ नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता.चांदवड या शाळेत उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक म्हणून देविदास शिवराम हिरे हे प्रसिद्ध आहेत. फळ्यावरील सुंदर, सामाजिक संदेशपर, खडू माध्यमातील श्री.हिरे यांची चित्रे आज सर्वांचं समाज प्रबोधन करत आहेत.

या काळ्या फळ्याचा योग्य वापर करून भारतीय सण, उत्सव, मराठी अस्मिता, हुंडाबळी, लेक वाचवा, पाणी वाचवा, रक्तदान करा, मतदान करा, नेत्रदान करा, स्वछता अभियान, धूम्रपान निषेध, ऐतिहासिक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, त्यांची चित्रमय माहिती असे आजपर्यंत दोन हजारपर्यंत फलक रेखाटली आहेत.

कलाशिक्षक श्री.देव हिरे यांना त्यांच्या या कार्याबद्दल जिल्यातील,राज्यातील अनेक संस्थांनी पुरस्कृत केले आहे. फलक रेखाटन स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक त्यांना मिळालेला आहे.त्याचबरोबर ओ.एम.जि.बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड, भारत वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड,मध्ये नोंद झाली व असे एकोणतीस पुरस्कार श्री.हिरे यांना प्राप्त झाले आहेत.

या शिक्षकाचे ‘शिक्षण मंडळ भगूर’ संस्थेचे अध्यक्ष श्री. का. पां. गांगुर्डे, कार्याध्यक्ष श्री. एकनाथराव शेटे, कार्यवाह श्री.मधुसूदन गायकवाड, सहकार्यवाह श्री.अनिल कवडे, तसेच संस्था सदस्य यांनी संस्थेमार्फत कौतुक व गौरव केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक कृ. बा. लोखंडे,पर्यवेक्षक आ. वि. सोनवणे यांनी या उपक्रमशील कलाशिक्षकास वेळोवेळी कौतूक करून प्रोत्साहित केले आहे.

First Published on: January 18, 2022 8:30 AM
Exit mobile version