मतदारांचा प्रतिसाद, मतदार याद्यांतील गोंधळ कायम

मतदारांचा प्रतिसाद, मतदार याद्यांतील गोंधळ कायम

सकाळपासूनच नाशिककर मतदारांचा प्रतिसाद दिसून आला.

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २९ एप्रिलला सुरू झालेल्या मतदानाला शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी सव्वा सात वाजेपासूनच नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे नावे शोधताना मतदारांची चांगलीच दमछाक झाली. उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वीच मतदार घराबाहेर पडल्याने, सर्वत्र उत्साह कायम होता.

दिंडोरी लोकसभा निवडणुकीतील युतीच्या उमेदवार भारती पवार यांनीही रांगेत उभे राहून मतदान केले.

युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

First Published on: April 29, 2019 8:50 AM
Exit mobile version