पेट्रोलने भरलेल्या वॅगन्सचा अपघात टळला

पेट्रोलने भरलेल्या वॅगन्सचा अपघात टळला

कपलिंग तुटल्याने थांबलेली रेल्वे वॅगन.

नांदगांवनजीक डाऊन लोहमार्गावरील पेट्रोलने भरलेल्या ५२ वॅगन्स घेऊन जाणाऱ्या रेल्वेचा अपघात रेल्वे गार्ड आणि गँगमनच्या सतर्कतेमुळे टळला. दोन वॅगन्सला जो़डणाऱी कपलिंग तुटल्याने, काही अंतर पुढे गेलेले इंजिन थांबवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. सुमारे तासाभराच्या दुरुस्तीनंतर वॅगन मार्गस्थ झाली.

पानेवाडी (मनमाड) येथील पेट्रोलियम प्रकल्पातून इंधन घेऊन ५२ वॅगन्स भुसावळ मार्गाकडे तडली येथे निघाले होते. ही रेल्वे पोल नंबर २८४ जवळ असतानाच, १४ क्रमांकाच्या डब्याजवळील दोन डब्यांना जोडणारी कपलिंग लोहमार्गावर तुटून पडली. त्यामुळे रेल्वेचे इंजिन काही अंतरावर जाऊन थांबले, तर कपलिंगपासून तुटलेल्या मागील वॅगन्स जागीच थांबल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना पाहताच लोहमार्गावरील गँगमन मदतीसाठी धावला. रेल्वे गार्डने रेल्वे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना ही घटना कळवली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कपलिंगची दुरुस्ती केल्यानंतर ही वॅगन मार्गस्थ झाली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

First Published on: May 16, 2019 4:44 PM
Exit mobile version