नाशिक मनपा निवडणूक आम्हीच जिंकणार : संजय राऊत

नाशिक मनपा निवडणूक आम्हीच जिंकणार : संजय राऊत

नाशिक : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने आज (दि.१५) नाशिक मध्ये दाखल झाल्या-झाल्या त्यांनी मनपा निवडणूक जिंकणारच अशी भीमगर्जना केली.

खा. संजय राऊत यांनी मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांनी नाशिक कडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक महानगरपालिकेतील मागील १० वर्षांचा सत्तेचा दुष्काळ दूर करायचा या भावनेतून त्यांनी चांगलीच कंबर कासल्याचे दिसून येते. त्या दृष्टिकोनातून आपले विश्वासू सहकारी मुख्य पदांवर बसवणे असोत की विविध पक्षातील दिग्गजांना आपल्या कंपूत ओढण्याची खेळी असोत यातून नाशिक मनपा निवडणूक हेच ध्येय दिसून येते.

राऊत, यांचा हा दौराही त्याच दृष्टीकोनातून असल्याचे दिसून येते. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते नाशिक मनपा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बनवलेल्या कोअर कमिटीची बैठक घेत संघटिय कामकाजाचा आढावा घेत. पुढील रणनीती यावर चर्चा करून कोअर कमिटीच्या सदस्यांना काही कानमंत्रही देण्याची शक्यता आहे.

उद्या (दि.१६) खा. संजय राऊत शहरात विविध विकास कामांचेही उदघाटन करणार असून त्याच सोबत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते पत्रकारांनाही संबोधित करतील.

First Published on: April 15, 2022 2:47 PM
Exit mobile version