भुजबळांचे पराक्रम अवघ्या देशाला परिचित

भुजबळांचे पराक्रम अवघ्या देशाला परिचित

मेळाव्यात बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन

नाशिकचे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्याबददल बोलावं तितकं कमी आहे. त्यांचे पराक्रम नाशिककरांनाच नव्हे तर राज्य आणि देशालाही माहीत आहे. या उमेदवाराविषयी न बोललेच बरं. कितीही पैसा वाटला,जाहिरातबाजी केली, कुटनिती केली तरी नाशिककर त्यांना ओळखून आहे. भुजबळांना लोकं मतदान करणार नाही. इतकं असूनही समीर भुजबळ पुन्हा निवडणुकीला उभे राहीले. खरं म्हणजे त्यांच्या हिमतीला दादच द्यायला हवी अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळांवर शरसंधान साधले.

श्रध्दा लॉन्स येथे भाजप सेना महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी महाजन म्हणाले, आज केंद्रात, राज्यात आपली सत्ता आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दोन्ही पक्षांचे प्राबल्य आहे. भाजपने निवडणुकीच्या दृष्टीने पेज प्रमुख, बुथ प्रमुख नेमून सुक्ष्म नियोजन केले आहे. महापालिकेतही ८५ टक्के नगरसेवक आपले आहेत. भाजपने १० हजार कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे. त्यामुळे आता नाशिकचा निकाल काय असेल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची आपल्याला आवश्यकता नाही. परंतु सगळं असूनही गाफिल राहता कामा नये. आपल्याला प्रत्येकाला जागरूक राहून निवडणुक कामात आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. नाशिकमध्ये अनेक विकास कामे मागील पाच वर्षात झाल्याचे सांगत देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले. मध्यंतरीच्या काळात आपल्यात कटुता आली; परंतु भाजपाध्यक्ष अमित शहा आणि सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाच हित लक्षात घेउन पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा महाराष्ट्राचा चमत्कारिक संख्या लोकसभेत दिसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चोैधरी, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

राहूल गांधी बालिशबुद्धीचे

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी लालकृष्ण अडवाणींबददल केलेल्या विधानाचा समाचार घेताना महाजन यांनी राहुल गांधी बालीश बुद्धीचे असल्याचा आरोप केला. त्यांच्या बुद्धीची मला किव येते. काँगेेस कार्यकर्त्याला पडत नाही, असे स्वप्न राहुल गांधींना पडतात. कुठे काय बोलावं हेच त्यांना समजत नाही. पुण्यातल्या सभेत त्यांनी मी मोदींवर प्रेम करतो, असे वक्तव्य केले. त्यामुळे सभेत मोदींचा जयघोष झाला. रोज नवीन आयटम त्यांच्या सभेत पहायला मिळतो अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींच्या भाषणाची खिल्ली उडवली.

महाजन म्हणाले…

First Published on: April 5, 2019 9:43 PM
Exit mobile version