अपघाताचा थरार… विटांच्या ट्रॅक्टरमधील मजूर थोडक्यात बचावले

अपघाताचा थरार… विटांच्या ट्रॅक्टरमधील मजूर थोडक्यात बचावले

लासलगाव – लासलगाव विंचूर रस्त्यावरील ॲक्सिस बँकेसमोर टँकरने कट मारल्यानं विटांनी भरलेला टँकर उलटला. या अपघातात सुदैवाने मजूर थोडक्यात बचावले. याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी ट्रक आणि मोटरसायकलचा अपघात झाला होता. त्यातील अपघातग्रस्त ट्रक रस्त्याकडेला उभा असल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय.

बुधवारी (दि.१५) दुपारी २ वाजेच्या सुमारास रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या टँकरने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला कट मारला. अचानक झालेल्या या प्रकाराने चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. ट्रॅक्टरचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने विटा भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली जागेवरच उलटली. या ट्रॉलीवर बसलेले चार ते पाच मजूर जखमी झाले. ही घटना जवळच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी रस्त्यावरून तातडीने बाजूला करणे गरजेचे असताना संबंधित मालक व पोलीस व यंत्रणांनी त्याकडे डोळेझाक केली. त्यामुळेच ट्रॅक्टर उलटल्याचे सांगितले जाते आहे.

First Published on: December 15, 2021 9:42 PM
Exit mobile version