Video | महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाचे जलपूजन

Video | महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाचे जलपूजन

गंगापूर धरण ९७ टक्के भरल्याने महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२७) जलपूजन करण्यात आले. यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. धरण पूजनाप्रसंगी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने धरणाच्या पाण्यापर्यंत सहजपणे हात पोहचत होता. परिणामी दरवर्षी दिसतो तसा ‘कोकनट थ्रो’चा कार्यक्रम यंदा दिसून आला नाही.

गंगापूर धरणात सध्या ५ हजार ४६७ दशलक्ष घनफूट इतके पाणी आहे. हा समाधानकारक पाणीसाठा असल्याने परंपरेप्रमाणे महापौरांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृह नेते सतीष सोनवणे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, नगरसेविका प्रियंका माने, पुनम मोगरे, रुची कुंभारकर, धनंजय माने, संतोष गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. धरणाच्या पाण्यापर्यंत हात पोहचत नसल्याने दरवर्षी नारळाचा ‘थ्रो’ केला जायचा. त्यावेली कुणाचे नारळ किती लांब जाते याची जणू स्पर्धाच लागायची. त्यामुळे प्रत्येक वर्षी या ‘कोकनट थ्रो’ स्पर्धेची चर्चा व्हायची. यंदा मात्र पाण्याची पातळी वरपर्यंत असल्याने सहजपणे पाण्यापर्यंत हात पोहचत होते. त्यामुळे ‘कोकनट थ्रा’े करण्याची कुणाला गरजच भासली नाही.

गंगापूर धरणाचे विधीवत पूजन

First Published on: August 27, 2019 2:26 PM
Exit mobile version