युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे, हे कौतुकास्पद.. – पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे, हे कौतुकास्पद.. – पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाच्या टी- शर्टसचे प्रकाशन करतांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार. समवेत विशाल गांगुर्डे, रोहित कळंबकर, मयूर पवार, तुषार गायकवाड, संकेत निमसे, अविनाश बरबडे, गणेश शेळके, प्रतीक जेजुरकर, प्रकाश चितोडकर, सुशांत पाटील आदी

विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा स्तुत्य उपक्रम असून नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना देण्यात येणाऱ्या टी-शर्टचे प्रकाशन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयात करण्यात आले. जांभळ्या रंगाच्या या टी-शर्टवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे नाव व महिती आहे.

विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे देखील पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले. देव द्या, देवपण घ्या ! ह्या उपक्रमाची युवकांकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असल्याने त्याचेही कौतुक पाटील यांनी केले.

दिड दिवस, पाच दिवस व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्तींचे संकल देखील विद्यार्थी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांपासून देव द्या, देवपण घ्या उपक्रमात राबविला जात असून यंदाचे नववे वर्ष आहे. या उपक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य मिळत आहे.

चोपडा लॉन्स येथे स्विकारणार मूर्ती

प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांच्या मूर्तीपासून गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी गुरुवार दि.१२ सप्टेंबर २०१९ रोजी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ११ ते ४ या वेळेत ‘देव द्या देवपण घ्या’ उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहे.

First Published on: September 9, 2019 5:55 PM
Exit mobile version