विक्रीकर विभागाला १.६० कोटींना गंडा

विक्रीकर विभागाला १.६० कोटींना गंडा

विक्रीकर विभागाला १.६० कोटींना गंडा

विक्रीकर विभागाच्या ताब्यातील प्लॉट पाच जणांनी परस्पर १ कोटी ६० लाखांना विक्री केल्याची घटना पुढे आली आहे. ही जागा ज्या महिलेला विक्री केली, तिच्याकडून आणखी १ कोटींची मागणी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी महिलेने सरकारवाडा पोलिसांत पाच जणांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दिनेश सुभाष शर्मा, सुभाषचंद्र शर्मा, राज राठोड, अभिजित दिघोळे, संदीप कुटे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शर्मा यांनी त्यांच्या मालकीचा अंबड एमआयडीसी वसाहतमधील प्लॉट क्र. ईसी-२ १० ऑक्टोबर २०१५ रोजी विक्रीकर उपायुक्तांनी जप्त केला होता. मिळकत जप्त असतानाही विक्रीकर विभागाने लावलेले सील काढून त्या मिळकतीवर बोजा नाही, असे भासवून ती मिळकत विक्री करण्याचे मुखत्यारपत्र राजू पवारला करून दिले. त्यानंतर मिळकत विक्रीच्या मोबदल्यात महिलेकडून २० ते ३० डिसेंबर २०१७ दरम्यान आरटीजीएसच्या माध्यमातून १ कोटी ६० लाख रुपये घेतले. शर्मांनी बनावट खाते उघडत खात्यावर सर्व रक्कम जमा केली. ‘एनओसी’साठी पुन्हा १ कोटी रुपयांची मागणी केली. अन्य आरोपी राज राठोड, अभिजित दिघोळे, संदीप कुटे यांनी प्लॉट खाली करण्यासाठी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यातून फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एस. आर. पवार तपास करत आहेत.

First Published on: June 22, 2019 8:28 AM
Exit mobile version