दारणा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

दारणा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

दारणा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१४) घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अमोल संजय पाटील (27 रा.प्रबुद्धनगर, अश्विनीकॉलनी जवळ, सामनगाव रोड, देवळाली) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल पाटील गुरुवारी दारणा नदीपात्रात अंघोळीसाठी आला. पाण्यात उडी मारल्यानंतर तो बाहेर आलाच नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस दिगंबर मोरे हे तपास करत आहे.

First Published on: May 14, 2020 10:39 PM
Exit mobile version