नवी मुंबई परिसरात स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार, केंद्र सरकारचे आदेश

नवी मुंबई परिसरात स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार, केंद्र सरकारचे आदेश

भारतीय हवामान विभागाकडून नवी मुंबईतील परिसरात स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीसाठी हालचाली केल्या जात आहेत. खरंतर काही दिवसांपूर्वी खारघर मध्ये झालेल्या जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा पुरस्कार सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घनेनंतर आता हे पाऊल उचलले जात आहे. या संदर्भातील प्रस्ताव हा पृथ्वी विज्ञान केंद्राला पाठवला आहे. त्यावर त्यांनी त्या जागेची पाहणी करत स्वयंचलित हवामान केंद्राची जागा निश्चित करण्याचे आदेश मुंबईत प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिकांना दिले आहेत.

पावसाळ्यापूर्वीच जागा ठरवून स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. हे केंद्र बसवल्यानंतर परिसरातील कमाल आणि किमान तापमान, पावसाची नोंद, वाऱ्याचा वेग अशा गोष्टींची माहिती मिळणार आहे. आयएमडीकडून जागेची पाहणी करत लवकरात लवकर परिसराचे निरिक्षण केले जाणार आहे.

या व्यतिरिक्त राज्यात ज्या अन्य ठिकाणी अशा केंद्रांची गरज आहे तेथे ही सर्वेक्षण करुन तशी केंद्रे उभारली जाणार आहेत. खरंतर एक केंद्र उभारणीसाठी जवळजवळ पाच लाखांपर्यंतचा खर्च येतो. परंतु काही ठिकाणी ही यंत्रणा तेथील हवामान विभागाच्या निर्धारित निकषांनुसार नसते.

दरम्यान, आयएमडीचे एकही केंद्र नवी मुंबईत नाहीत. त्यामुळेच लवकरात लवकर ते केंद्र उभारणीसाठी पावले उचलली जाणार आहेत. तर धर्माधिकाऱ्यांच्या पुरस्कार सोहळ्यावेळी तेथील तापमान हे ४१ अंश किंवा त्यापेक्षा ही अधिक होते असे हवामान तज्ञांनी सांगितले. पण आयएमडीचे केंद्र घटनास्थळी नसल्याने नक्की तेथील तापमान किती होते याची आकडेवारी सांगता आली नाही. त्यासाठी समस्या मात्र उद्भवली गेली.

खारघर मधील एकूण दुर्घनेमुळे राजकीय वातावरण तापले गेलेच आहे. परंतु कार्यक्रमाची वेळ दुपारी का ठेवली गेली असा सुद्धा सवाल काहींनी उपस्थितीत केला आहे. उन्हात तब्बल ६-७ तास नागरिकांना बसून रहावे लागले होते. अशातच त्यांचा हिट-स्ट्रोकने १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. दुसऱ्या बाजूला अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी यावरुन राजकरण करु नये असे आवाहन सुद्धा केले होते. परंतु याच दरम्यान, त्यांच्या नावाने एक बनावटी पत्र सुद्धा समाजमाध्यमांवर सध्या तुफान व्हायरल झाले आहे.


हेही वाचा- समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेले पत्र बनावट; आप्पासाहेब धर्माधिकारींकडून खुलासा

First Published on: April 23, 2023 11:17 AM
Exit mobile version