अमरावती केमिस्ट हत्येप्रकरणी पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खासदार नवनीत राणांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

अमरावती केमिस्ट हत्येप्रकरणी पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खासदार नवनीत राणांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये उदयपूरप्रमाणेच हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. 21 जून रोजी अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या केमिस्टने भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या, त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ही घटना उदयपूर घटनेप्रमाणे असल्याचे दावा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी देखील केला आहे. या प्रकरणी आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्र लिहित अमरावती पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नवनीत राणा यांनी अमित शाह यांनी लिहिले पत्र

खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित या घटनेसाठी अमरावती पोलीस आयुक्तांना जबाबदार ठरले आहे. तसेच या अमरावतीच्या पालकमंत्र्यांच्या दबावाखाली येत पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी या घटनेवर पडदा टाकण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय घटनेतील आरोपींवर क़डक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नवनीत राणा यांचे पत्र 

प्रति,

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

भारत सरकार, नवी दिल्ली

विषय :- अमरावती शहराच्या (महाराष्ट्र) बेजबाबदार पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या कार्यकाळात अमरावतीमधील प्रसिद्ध केमिस्ट उमेश कोल्हे यांची निर्दयीपणे हत्या झाली. या घटनेचा तपास सीबीआय आणि एनआयएद्वारे करत आरोपी आणि त्या मागील चेहऱ्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात

वरील विषयाच्या अनुषंगाने, अमरावती शहरात (महाराष्ट्र) पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या कार्यकाळात दिवसाढवळ्या खून, दंगली, अवैध धंदे आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतेच 21 जून 2022 रोजी अमरावतीचे सुप्रसिद्ध व्हेटरनेरी केमिस्ट व्यापारी उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली, यावेळी आयुक्त आरती सिंह यांनी दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करताना 04 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन प्रकरण मिटवले. या घटनेमुळे अमरावती पोलीस आयुक्तालयाप्रती व्यापारी व नागरिकांचा असंतोष वाढत असून ठिकठिकाणी आंदोलने करत निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेमागची दुसरी बाजू आज पाहायला मिळत आहे. या घटनेला नुकत्याच झालेल्या उदयपूरच्या घटनेशी जोडता येईल. अमरावतीच्या पालकमंत्र्यांच्या दबावाखाली येत पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी या घटनेवर पडदा टाकण्याचे काम करत आहेत.

उमेश कोल्हे हे नेहमीच हिंदू आणि हिंदू चर्चेच्या हितासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणाचा कुठेतरी उदयपूरच्या घटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे या घटनेचा तपास सीबीआय आणि एनआयएद्वारे करत घटनेमागील चेहरा कोण आहे आणि कोण गुन्हेगार या घटनेत सामील आहेत, त्यांचा शोध घेत या घटनेशी संबंधित गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, तसेच संबंधित मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्या.

सत्ताधारी पक्षाला खूश करण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह अशा युक्त्या नेहमी अवलंबतात. त्यामुळे अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी. तुमच्या सहकार्याची वाट पाहत आहे. अशी मागणी या पत्रात केली आहे.

घटना नेमकी काय आहे? 

कोल्हे यांचे अमरावती येथे मेडिकल स्टोअर आहे, त्यांनी देशात नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाला विरोध होत असताना त्या विधानाच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या ग्रुपमध्ये काही मुस्लिम बांधवही होते. पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. यावेळी आरोपी इरफान याने ती पोस्ट पाहिली आणि कोल्हे यांना मारण्यासाठी पाच जणांना पाठवले.

२१ जून रोजी केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होते. त्यांच्यासोबत दुसऱ्या गाडीवर पत्नी आणि त्यांचा 27 वर्षीय मुलगा संकेत होता. काही अंतर गेल्यावर काही दुचाकीस्वारांनी केमिस्ट उमेश यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा जीव घेतला. याप्रकरणी केमिस्ट उमेश यांचा मुलगा संकेत याने अमरावती येथे राहणारे मुदस्सीर अहमद (२२), शाहरुख पठाण (२५), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२) आणि अतीब रशीद (२२) यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहेत.


मोहम्मद जुबेरला पटियाला हाऊस कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


First Published on: July 2, 2022 4:03 PM
Exit mobile version