parambir singh: राज्य सरकारच्या बदनामीसाठी परमबीर सिंहांचे भाजपसह केंद्रासोबत डील, NIAच्या खुलाशाची नवाब मलिकांची मागणी

parambir singh: राज्य सरकारच्या बदनामीसाठी परमबीर सिंहांचे भाजपसह केंद्रासोबत डील, NIAच्या खुलाशाची नवाब मलिकांची मागणी

परमबीर सिंहांच्या माध्यमातून मविआ सरकारला बदनाम करण्याचे केंद्राचे प्रयत्न, नवाब मलिकांचा आरोप

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भाजप आणि केंद्र सरकारशी डील केली होती. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएला याबाबतची माहिती आज नाहीतर कधीतरी सादर करावी लागणार आहे. कारण सत्य कितीही लपवले तरी लपून राहत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंह यांच्याबाबतची माहिती एनआयएने स्पष्ट करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. सचिन वाझेंनी चांदीवाल आयोगासमोर दिलेल्या जबाबात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक माध्यमांशी संवाद साधताना परमबीर सिंह आरोप करुन पुन्हा गायब झाले असल्याचे म्हणाले. परमबीर सिंह यांनी खोटे आरोप करुन राजकीय षडयंत्र करुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फसवलं आहे. देशमुखांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात आले असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच खंडणी प्रकरणाची चौकशी चांदीवाल आयोगाकडून करण्यात येत आहे. या आयोगासमोर देशमुख यांना खंडणी गोळा करुन पैसे दिले नाही. असा जबाब सचिन वाझेंनी नोंदवला आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

एनआयएने चौकशी केल्यावर परमबीर सिंह फरार

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची एनआयएनं चौकशी केल्यावर ते गायब झाले आहेत. अँटिलीया बंगल्याबाहेर स्फोटक पदार्थ असलेली गाडी ठेवण्यात आली होती. या प्रकरणात एनआयएनं परमबीर सिंह यांची चौकशी केली आहे. या चौकशीनंतर परमबीर सिंह पुन्हा फरार झाले. एनआयएच्या चार्जशीटमध्ये ज्या मुख्य सुत्रधाराचे नाव आहे. तो कोण आहे. त्याच्याबाबत एनआयनं माहिती दिली पाहिजे असे नवाब मलिक म्हणाले. इनोव्हा गाडीबाबत चर्चा केली जाते. ड्रायव्हरची चौकशी केली जाते पंरतु परमबीर सिंह यांच्या घरात वाझे आणि शर्मा का भेटले होते याबाबत चर्चा होत नाही. परमबीर सिंह यांच्या नावाची चर्चा होत नाही. एनआयए केंद्र सरकारच्या दबावात येऊन परमबीर सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.


हेही वाचा : अनिल देशमुखांनी कधीच पैशांची मागणी केली नाही; चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा मोठा खुलासा


 

First Published on: December 14, 2021 5:06 PM
Exit mobile version