अँटिलिया प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येणार, फेक पासपोर्टवरुन नवाब मलिकांचा इशारा

अँटिलिया प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येणार, फेक पासपोर्टवरुन नवाब मलिकांचा इशारा

भाजपकडून केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांची टीका

अँटिलिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मनसुख हिरेन आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी फेक पासपोर्ट तयार केला होता. याबाबत एनआयएने खुलासा करावा अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली आहे. अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी केलं असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच आणखी एक धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचा सूचक इशारा देखील नवाब मलिकांनी दिला आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना परमबीर सिंह यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. नवाब मलिक म्हणाले आहेत की, अँटिलियाबाहेर बॉम्ब ठेवण्याचे कारस्थान माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी केलं आहे. विधानसभा अधिवेशन सुरु असताना राज्य सरकारला चुकीची माहिती देण्यात येत होती. हत्या केल्यानंतरही चुकीची माहिती देण्यात येत होती. परमबीर सिंह यांची होमगार्डला बदली करण्यात आली तेव्हा त्यांनी ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. सीबीआय आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आता हे प्रकरण चांदीवाल आयोगासमोर आहे. हा सगळा न्यायालयीन लढा आहे. पण हा सगळा विषय राजकीय हेतूने करण्यात आला होता असे नवाब मलिक म्हणाले.

फेक पासपोर्ट बनवला.. मनसुखचा एन्काउंटर प्लानही केला

अँटिलिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येणार आहे. या प्लॅनिंगमध्ये एक फेक पासपोर्ट तयार करण्यात आला आहे. त्यावर पाकिस्तानचे एक्झिट आणि इंटर चा प्लॅन वाझेने आणि परमबीर सिंह यांनी केला होता. जर मनसुख हिरेनची हत्या झाली नसती तर मनसुख हिरेन पोलिसांच्या स्वाधीन झाला असता. त्यामुळे मनसुखचा एन्काउंटर करण्याचा प्लॅन परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी केला होता. सचिन वाझेच्या घरातून एनआयएला फेक पासपोर्ट मिळाला आहे. एनआयएने ही माहिती उघड केली पाहिजे असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

न्यालयाच्या निर्णयानंतर परमबीर सिंहांवर अटकेबाबत कारवाई

परमबीर सिंह यांच्यावर एकूण ५ तक्रारी दाखल आहेत. ३ ठाण्यात आणि २ मुंबईत आहेत. पोलिसांचे पथक त्यांची चौकशी करत आहे. आज ठरवले आणि तुरुंगात टाकायचे अशी केंद्रासारखी भूमिका नाही. परमबीर सिंह यांची चौकशी सुरु आहे. चौकशीमध्ये काहीतरी समोर येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चौकशी सुरु आहे. ६ डिसेंबरपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. परंतु न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल.


हेही वाचा :  परमबीर सिंह – वाझे भेटीमुळे गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश


 

First Published on: November 30, 2021 3:52 PM
Exit mobile version