घरमहाराष्ट्रपरमबीर सिंह - वाझे भेटीमुळे गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश

परमबीर सिंह – वाझे भेटीमुळे गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील बैठकीच्या चौकशीचे मुंबई पोलिसांना आदेश दिल्याचे आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची तब्बल एक तास भेट झाली होती. यावर बोलताना गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले की, “परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यात काल जी भेट झाली, त्यानंतर मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. परमबीर सिंह यांच्या चौकशीसाठी दबाव असण्याचे काही कारण नाही. परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षेमुळे सर्व पोलीस स्टेशनमधील त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्याचा ते जबाब देत आहेत.”

“सीबीआयच्या राज्य सरकार सहकार्य करत नसल्याच्या दाव्यावर बोलताना पाटील म्हणाले की, राज्य सरकार आपलं काम करतयं, सीबीआय आपलं काम करतयं, सहकार्य करण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. राज्य सरकार जिथे कृती करायला पाहिजे तिथे बरोबर कृती करतयं.” असही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

- Advertisement -

“परमबीर सिंह यांना अनेकदा समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत यावर नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ती कारवाई निश्चित होईल. हे खूप चुकीचे आहे, न्यायालयीन कोठडीत असलेल्या व्यक्तीला बाहेरच्या व्यक्तीला न्यायालयाच्या परवानगीशिवाय भेटण्याची परवानगी नसते. तरीही परमबीर सिंह यांनी वाझेची भेट घेतली. परंतु नेमकी ही भेट कशी झाली याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.” असंही पाटील म्हणाले.

अद्याप पदभार स्विकारला नाही 

“परमबीर सिंहांच्या निलंबनावर कायदेशीर प्रक्रिया सुरु असून लवकरंच यासंदर्भातील अंतिम निर्णय घेऊ. त्यांनी आत्तापर्यंत कोणताच पदभार स्वीकारला नाही, तसेच राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही माहिती दिली नाही.परमबीर सिंह यांना कोर्टाने समन्स बजावला असताना आणि ड्युटीवर नसतानाही त्यांनी सरकारी गाडी, गर्व्हमेंट मस्टरिचा वापरणे करणं चुकीचे होते. परमबीर सिंह यांनी होमगार्ड ऑफिसमध्ये गेले असले तरी ते त्यांनी महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही ते बाहेरच्या वेटिंग रुममध्ये बसले होते.” असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -