Nawab Malik: करावे तसे भरावे, देशात कायदाच सर्वश्रेष्ठ, नवाब मलिकांच्या अटकेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

Nawab Malik: करावे तसे भरावे, देशात कायदाच सर्वश्रेष्ठ, नवाब मलिकांच्या अटकेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

Nawab Malik: करावे तसे भरावे, देशात कायदाच सर्वश्रेष्ठ, नवाब मलिकांच्या अटकेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध आणि आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्ड्रींगप्रकरणी) नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. करावे तसे भरावे अशी खोचक प्रतिक्रिया भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसेच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनंतर आता अनिल परब यांचा नंबर असल्याचा इशारा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. नवाब मलिकांना तब्बल ८ तासाच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. मलिकांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. देशात कायदाच सर्वश्रेष्ठ आहे. करावे तसे भरावे अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. दरेकर म्हणाले की, करावे तसे भरावे या देशामध्ये कायदा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्यासमोर मंत्री, आमदार, खासदार कोणी मोठा नाही हे पुन्हा कायद्याने दाखवले आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार आपल्या हातात नाही आहे. सत्ताधारी लोकांना नाहीच नाही. नवाब मलिकांचा कोणता संबंध ई़डीच्या कोणत्या विषयात असेल तर ते आपल्याला माहिती नाही. मात्र चौकशी करुन तपास करणं हा तपास यंत्रणेचा भाग आहे. ईडीच्या तपासात अटक करणं गरजेचे वाटलं असेल तर त्या संदर्भात कारवाई असेल आणि यामध्ये जर तथ्य नसेल तर ईडीसारखी यंत्रणा कोणालाही ताब्यात घेणार नाही असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

ईडीची कारवई बेकायदेशीर असल्यास राष्ट्रवादीनं कोर्टात जावं

नवाब मलिकांवरील कारवाई बेकायदेशीर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यावर दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर ठरवणारी न्याय यंत्रणा आहे. हे बेकायदेशीर असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोर्टात बेकायदेशीर अॅक्ट ईडीने केला आहे अशा प्रकारे दावा करावा आणि जर बेकायदेशीर असेल तर कोर्ट कारवाई करेल. देशात अनेक गोष्टी आणि प्रसंगात आपण हे पाहिलं आहे. नेत्याला अटक केल्यानंतर पक्षातील कारवाई स्वाभाविकपणे तसेच आक्रमक होणार. या देशामध्ये बेकायदेशीर कोणालाच काही करता येत नाही असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

आता तिसरा नंबर अनिल परबांचा

माजी गृहमंत्री अनिल देशमुखनंतर नवाब मलिक आणि त्यानंतर तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार असल्याचे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा तिसरा नंबर असल्याचा दावा यावेळी सोमय्यांकडून करण्यात आला आहे.


हेही वाचा : Nawab Malik Arrested: मनी लाँड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिकांना ‘ईडी’ कडून अटक

First Published on: February 23, 2022 4:00 PM
Exit mobile version