घरताज्या घडामोडीNawab Malik Arrested: मनी लाँड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिकांना 'ईडी' कडून अटक

Nawab Malik Arrested: मनी लाँड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिकांना ‘ईडी’ कडून अटक

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आठ तासांच्या ईडी चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. आज पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांना त्यांच्या घरातून ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. सुमार सकाळी सात वाजल्यामुळे मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता मलिकांना अटक करण्यात आले असून त्यांना मेडिकल चाचणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान आठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर नवाब मलिक यांनी ‘नही झुकेंगे और लढेंगे’ अशी पहिली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.

- Advertisement -

पुढील कारवाई काय? 

अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपीला कोर्टासमोर रिमांडसाठी हजर करावे लागते. तसेच रिमांड करण्याआधी मेडिकल चाचणी करणे खूप गरजेचे असते. आरोपीला कोणता आजार किंवा त्रास असेल तर ते मेडिकलमधून समोर येते. कोर्टासमोर मेडिकल फिट आरोपी हजर करावा लागतो. त्यामुळे आता नवाब मलिक यांना मेडिकलसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले आहे. माहितीनुसार, जवळपास आजच सायंकाळी चार किंवा साडे चारच्या सुमार नवाब मलिकांना कोर्टासमोर हजर केले जाईल आणि त्यांची रिमांड घेतली जाईल. मग यापुढे जे काही पुरावे मिळतील त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. सध्या नवाब मलिक यांच्यावर प्रिव्हनेशन मनी लाँड्रिंग अॅक्ट (Prevention of Money Laundering Act) या अंतर्गत कारवाई केली जात आहे. मलिकांना ईडीची कोठडी मिळण्याची शक्यता आहे.

नेमके प्रकरण काय? 

काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मुंबईत आणि लगतच्या परिसरात छापेमारी केली होती. दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या घरीदेखील ईडीने छापा टाकला होता. या छापेमारी दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील नेतेमंडळी ईडीच्या रडारवर असल्याचे समोर आले होते. या छापेमारीत दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान इब्राहिम कासकरने नवाब मलिकाचे नाव घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज ईडीने नवाब मलिकांची चौकशी करून त्यांना अटक केले आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया 

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने दक्षिण मुंबईतील कार्यालयातच नवाब मलिकांना अटक केली. त्यानंतर नवाब मलिकांना वैद्यकीय चाचणीसाठी जेजे रूग्णालयात नेण्यात आले. पण रूग्णालयात जाण्याआधी ना डरेंगे, ना झुकेंगे ! अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांच्याकडून आली. नवाब मलिकांना प्रसारमाध्यमांसमोर येताच ही प्रतिक्रिया दिली. तर त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरूनही ही प्रतिक्रिया देण्यात आली.


हेही वाचा – Nawab Malik ED enquiry: हे देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र; राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांचा आरोप


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -