डोकानियाला सोडविण्यासाठी भाजप वकिली करण्यासाठी का गेले?; नवाब मलिक यांचा सवाल

डोकानियाला सोडविण्यासाठी भाजप वकिली करण्यासाठी का गेले?; नवाब मलिक यांचा सवाल

नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस

‘ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? पोलिसांनी त्यांना चौकशी करण्यासाठी बोलवले होते, मग भाजपचे नेते वकिली करण्यासाठी का गेले?, असा सावल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. यासर्व प्रकारातून राज्यात कुठेतरी भाजपाची लोक साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू, अशी त्यांची भूमिका आहे’, असा आरोप नवाब मलिक यांनी भाजपवर केला आहे.

काय म्हणाले नवाब मलिक?

‘देशाअंतर्गत सात कंपन्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनासाठी आणि विक्रीकरता परवानगी देण्यात आली आहे. तर दोन कंपन्यांना परदेशात विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर या कंपन्या परदेशात असणाऱ्या दोन कंपन्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात करु शकतात. मात्र, निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध असून आम्हाला परवानगी द्या, अशी मागणी राज्य सरकारकडे करत आहेत. तर ब्रुक फार्मा कंपनीला रात्री उशीरा परवानगी देण्यात आली.

दरम्यान, याआधी पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना बोलवण्यात आले होते. त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरु होते. मात्र, मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड डीसीपी कार्यालयात दाखल झाले आहे. एखाद्यावेळेस पोलिसांना एखादी माहिती मिळाली तर पोलीस त्या व्यक्तीची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेतात. मग, या राज्याचे विरोधी पक्षनेते डोकानियाला सोडविण्यासाठी का गेले’?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा – कोरोना कहराने पुण्यात एकाच घरात १५ दिवसात पाच जणांचा मृत्यू


 

First Published on: April 18, 2021 11:39 AM
Exit mobile version