नवाब मलिक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीतच

नवाब मलिक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीतच

नवाब मलिकांना न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी

मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आज जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यांना आता मुंबईतील बॅलार्ड स्टेट येथील ईडी कार्यालयात परत आणले जात आहे. ते 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. दाऊद इब्राहिम आणि मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात आठ दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले.

ईडीच्या कोठडीत चौकशीदरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना 25 फेब्रुवारीला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली असून, नवाब मलिक यांच्या कार्यालयाने याला दुजोरा दिलाय.
ईडीच्या कोठडीत चौकशीदरम्यान नवाब मलिक सहकार्य करत नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत होते.

दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आले आणि त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत ईडीकडून एम्स दिल्लीचे खासगी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, नवाब मलिक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, आज त्यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.

नवाब मलिक यांचा मुलगाही ईडीच्या रडारवर

विशेष म्हणजे नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकही ईडीच्या रडारवर आहे. त्याला लवकरच ईडीकडून समन्स पाठवण्याची तयारीही सुरू आहे. बुधवारी ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंब आणि टोळीशी संबंधित सदस्य आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी यांच्याशी झालेल्या जमीन व्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांना अटक केली होती. नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलीय. मात्र अटक झाल्यानंतर दोनच दिवसांत त्यांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांनी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवाब मलिक यांची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना सोमवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.

नवाब चौकशीत सहकार्य करत नाही

दरम्यान, अटकेनंतर दोन दिवस नवाब मलिक चौकशीत ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचे वृत्त बाहेर आले होते. त्यामुळे आता ईडीने त्यांचा मुलगा फराज मलिककडे चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांच्या नावावर आहे.


हेही वाचाः केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेवून भारतीयांकडे लक्ष द्यावे, राऊतांचा ऑपरेशन गंगावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा

First Published on: February 28, 2022 11:12 AM
Exit mobile version