Nawab Malik Arrested : नवाब मलिक अटकेनंतर मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांना फोन, सायंकाळी वर्षावर खलबतं

Nawab Malik Arrested : नवाब मलिक अटकेनंतर मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांना फोन, सायंकाळी वर्षावर खलबतं

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालय (ED) कडून अटक झाल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आल आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची तातडीची बैठक सुरू झाली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांची सायंकाळी ६ वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यातही फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. तर मंत्रालयातही एक बैठक या अटकेनंतर झाल्याची माहिती आहे.

गृहमंत्र्यांनी मुंबई गाठली

आज सकाळीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना नवाब मलिकांविरोधात ईडीकडून कारवाईची कुणकुण लागल्यानेच त्यांनीही पुण्याहून थेट मुंबई गाठली. त्यानंतर ईडीच्या दक्षिण मुंबईतील बॅलर्ड पियर येथील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आली. महत्वाचे म्हणजे ईडीच्या टीमने याठिकाणी सीआरपीएफचीही मागणी केली. त्यामुळे दक्षिण मुंबईतील या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

मुख्यमंत्री – गृहमंत्री यांच्यात फोनवरून चर्चा

नवाब मलिक यांना दुपारी ३.०५ वाजता अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच मंत्रालयात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि मंत्र्यांचीही बैठक झाल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.

लडेंगे, जितेंगे, सबको एक्स्पोज करेंगे !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ८ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचलनायामार्फत अटक करण्यात आली. नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयातून बाहेर पडताच लडेंगे, जितेंगे, सबको एक्स्पोज करेंगे अशी प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यांनी हात वर करत घोषणा केली. पण घोषणा देणारे नवाब मलिक हे थकलेले आणि एकटे पडल्याची भावमुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर होती. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक हे दुसरे मंत्री आहेत, ज्यांना ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. याआधीच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणातील ही महाविकास आघाडी मंत्र्यावर झालेली ही कारवाई आहे.

नवाब मलिक यांच्या अटकेचा घटनाक्रम

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बॅलर्ड पियरच्या ईडीच्या कार्यलायाबाहेर मोठी गर्दी केली होती.

४.३० – पहाटे ४.३० वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घरी धाड टाकत त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

७ वाजता ईडीची टीम नवाब मलिकांना घेऊन ईडीच्या कार्यालयात दाखल झाली

३.०५ वाजता नवाब मलिक यांना अटक

३.४५ वाजता जेजे रूग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी हजर

४.०० नवाब मलिकांची मेडिकल पूर्ण, कोर्टाकडे रवाना

राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा – छगन भुजबळ 

अतिशय दुर्दैवीच गोष्ट काय कारणे ईडी देते ही महत्वाची गोष्ट. एखादा पक्ष किंवा व्यक्तीच्या विरोधात अशा रितीने वागण्याची आवश्यकता नाही. ईडीने अटक केल्याचे कळते. कायदेशीर लढाई पुढे सुरू होईल. कारण काहीही शोधता येतात. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजप नसलेल्या सगळ्या ठिकाणी होतच आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.


Nawab Malik Arrested: मनी लाँड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिकांना ‘ईडी’ कडून अटक

First Published on: February 23, 2022 4:31 PM
Exit mobile version