‘मलिकांचे ते फोटो पाठवा, तुम्हाला मिळेल मोठ्ठ बक्षीस’; नवाब मलिकांनी शेअर केलेल्या क्रांती रेडकरच्या चॅटचा फोटो खोटा

‘मलिकांचे ते फोटो पाठवा, तुम्हाला मिळेल मोठ्ठ बक्षीस’; नवाब मलिकांनी शेअर केलेल्या क्रांती रेडकरच्या चॅटचा फोटो खोटा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी खळबळजनक असा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या एका ट्विटर युझर्सकडे नवाब मलिक यांचे दाऊदसोबतचे फोटो असतील तर पाठवा तुम्हाला बक्षिस मिळेल, असं सांगात असल्याचा स्क्रिनशॉटमध्ये दिसत आहे. परंतु, हा फोटो खोटा आहे. मात्र या स्क्रीनशॉर्टबद्दल क्रांतीने काही तासांनी खुलासा केला असून हा सर्व प्रकार कोणत्या थराला चाललाय अशा शब्दांमध्ये तिने संताप व्यक केलाय.

नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये क्रांती रेडकरचं संभाषण आहे. यात, कॅप्टन जॅक स्पॅरो नावाचा युजर माझ्याजवळ नवाब मलिक आणि दाऊद यांचे संबंध असल्याचे स्ट्राँग पुरावे आहेत, असा मॅसेज करतो. त्यानंतर क्रांती रेडकर काय पुरावे आहेत? असा सवाल करते. यावर तो युझर्स माझ्याजवळ दाऊद आणि नवाब मलिक यांचे फोटो असल्याचं सांगतो. त्यावर क्रांती रेडकर पाठव, तुला बक्षिस मिळेल, असं सांगतेय. नवाब मलिक यांनी अजून एक स्क्रिन शॉट शे्र केला आह. ज्यावर मलिक छान जोक आहे, असं म्हणताना दिसत आहेत.

तथापि, हा स्क्रिनशॉट एडिटेड केल्याचं प्रथम दर्शनी दिसतेय. नवाब मलिक यांना सोमवारी न्यायालयाने खोटी माहिती शेअर करु नका असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे मलिक यांना याचा फटका बसतो का हे पाहावं लागेल.

नवाब मलिकांना बोलण्याचा अधिकार – हायकोर्ट

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास किंवा सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रकाशित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना मनाई करावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगत मागणी फेटाळली.

नवाब मलिक यांना देखील न्यायालयाने सल्ला दिला आहे. “कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी माहितीची पडताळणी केली पाहिजे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही. नवाब मालक पोस्ट करू शकतात. परंतु कोणतीही गोष्ट पूर्ण पडताळणीनंतरच पोस्ट करावी,” असे न्यायालयाने म्हटलं आहे.

 

First Published on: November 23, 2021 11:14 AM
Exit mobile version