भाजपच्या पोकळ धमक्यांना महाविकास आघाडीचे नेते घाबरत नाहीत, नवाब मलिक यांचा इशारा

भाजपच्या पोकळ धमक्यांना महाविकास आघाडीचे नेते घाबरत नाहीत, नवाब मलिक यांचा इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि जामीन नंतर भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना धमकी देण्यात आल्या आहेत. शिवसेना भाजपच्या वादात आता राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला इशारा दिला आहे. भाजपच्या पोकळ धमक्यांना महाविकास आघाडीचे नेते घाबरत नाही असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. भाजपला जे करायचे आहे ते करावे, भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला तर ही काय नवी गोष्ट नाही अशा शब्दांत नवाब मलिक यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या धमक्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कारवाई केल्यावर आता भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच भाजपकडून नेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, भाजपला जे काही करायचे आहे ते त्यांनी करावे, कुणाच्या विरोधात त्यांना तक्रार दाखल करायची असल्यास त्यांनी करावी. खोट्या केसमध्ये अडकवा अन्यथा जेलमध्ये टाका. सत्तेचा दुरुपयोग करा ही काय नवीन गोष्ट नाही. अशा शब्दांत नवाब मलिक यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप महान पक्ष कुणावरही कारवाई करु शकतो

भाजपच्या कारवाईच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही टीका केली आहे. भाजप कुणावरही कारवाई करु शकतो. इतका महान पक्ष आहे. भाजप परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करु शकते. त्यांच्या हातात यंत्रणा आहेत त्या काहीही करु शकतात असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहा वर्षांपुर्वी वक्तव्य केले होते त्या थप्पडचा आवाज तुम्हाला सहा वर्षाने ऐकायला आला का? तुमच्या कानात काहीतरी प्रॉब्लेन दिसतो आहे. आमच्याकडे कानाचे सर्जन आहेत ज्यांना सहा वर्षानंतर थप्पडचा आवाज ऐकायला आला असेल त्यांच्याकडे सर्जन पाठवून देऊ असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.


हेही वाचा : राणेंनी त्यांच्या खात्याचा विकास करावा, उगाच शहाणपणा कराल तर..; राऊतांचा इशारा


 

First Published on: August 26, 2021 3:41 PM
Exit mobile version