एनसीबीची धडक कारवाई, ड्रग्जप्रकरणी फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक

एनसीबीची धडक कारवाई, ड्रग्जप्रकरणी फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक

ड्रग्ज माफिया आरिफ भुजवालाच्या पत्नीची पाकिस्तानला भेट, एनसीबी घेणार शोध

ड्रग्जप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपीस नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आरिफ भुजवाला असे या आरोपीचे नावे असून मुंबईतून पळून गेलेला आरिफ हा रायगडला लपला होता. त्याला मंगळवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. आरिफच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच कारवाईत या अधिकार्‍यांनी नवी मुंबईतून परवेज खान ऊर्फ चिंकू पठाण आणि भिवंडी येथून रोहित वर्माला अटक केली होती. यातील परवेज हा करीमलालाचा नातेवाईक आणि दाऊद इब्राहिमचा खास सहकारी म्हणून परिचित आहे.

त्यांच्या चौकशीतून विकी जैन या व्यापार्‍याचे नाव समोर आले होते. विकी हा भिवंडी येथे राहत असून तिथेच त्याचे एक ज्वेलर्स दुकान आहे. त्यानतर या पथकाने भिवंडी येथून शनिवारी विकी जैनला अटक केली होती. तो आरिफच्या संपर्कात होता. ड्रग्ज व्यवसायासाठी त्याने आरिफला पैसे दिले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एनसीबीने विशेष मोहीम सुरु केली होती. तो दुबईला पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली होती.

शोध सुरु असतानाच तो रायगड येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एनसीबीचे एक विशेष पथक रायगड येथे गेले होते. या पथकाने माणगाव येथून आरिफला ताब्यात घेतले. आरिफ तिथे एका मित्राच्या घरी लपून बसला होता. अटकेनंतर आरिफला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. आरिफ हा या गुन्ह्यांतील एक मुख्य आरोपी आहे. तो दोन वेळा दुबईला गेला होता. त्याचे दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध आहे.

दाऊदचा सहकारी कैलास राजपूतला तो दुबईत भेटला होता. कैलास हा लंडन, जर्मननी आणि आखाती देशात ड्रग्ज नेटवर्क चालवितो. त्याने आरिफला मुंबईत ड्रग्ज व्यवसायासाठी आर्थिक मदत केली होती. ड्रग्जच्या व्यवसायात आरिफने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली असून ही संपत्ती त्याने त्याच्या पत्नीच्या नावाने घेतली होती. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल जप्त केले आहेत. आरिफविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असून याच गुन्हयांत त्याला आरोपी दाखविण्यात आले आहे.

First Published on: January 25, 2021 10:52 PM
Exit mobile version