अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी, शरद पवारांचे भाजपाला आवाहन

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी, शरद पवारांचे भाजपाला आवाहन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीतील जागा रिक्त आहे. या रिक्त जागेसाठी निवडणूक होणार आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेची शिवसेना आणि भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे भाजपाला आवाहन केले आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवार यांनी अंधेरी येथील पोटनिवडणुक बिनविरोध करावी असे आवाहन केले. “अंधेरी येथील पोटनिवडणुक बिनविरोध होणे हे योग्य राहील, राज्यातील पक्षांने राजकीय परंपरा पाळणे गरजेचे आहे, कारण गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यावेळी आम्ही उमेदवार दिला नव्हता” असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. (ncp chief sharad pawar talk on Andheri East Assembly Election)

याशिवाय, “अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका, कारण रमेश लटके यांचं योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचं आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार देऊ नये, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून संपलेली नाही. एका वर्षासाठी निवडणुका नको”, असेही शरद पवार यांनी म्हटले.


हेही वाचा – भाजपने ती निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे विनंती

First Published on: October 16, 2022 5:57 PM
Exit mobile version