Corona: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण

Corona: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करू दिली आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्लानुसार उपचार सुरू असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. तसेच संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करावी, असे आवाहन शरद पवार यांनी केली आहे. सध्या शरद पवार मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी होम क्वारंटाईन असल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवार म्हणाले की, ‘माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, पण काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्लानुसार मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की, त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.’

शरद पवारांच्या या ट्वीटनंतर अनेक नेते मंडळी काळजी घेण्यासाठी सांगत आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो, या सदिच्छा. आराम करा आणि काळजी घ्या.’

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक मंत्र्यांनी कोरोनाची लागण होताना दिसत आहे. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, प्रविण दरेकर अशा अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये आता काही जण कोरोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान राज्यात मागील काही दिवसांपासून ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. काल, रविवारी ४० हजार ८०५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आणि ४४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यात २ लाख ९३ हजार ३०५ जणांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Covid-19 third wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० टक्के मृत्यू लसीकरण न झालेल्यांचेच


 

First Published on: January 24, 2022 2:07 PM
Exit mobile version