कोरोना वाढतोय, पण सरकारला गांभीर्य नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

कोरोना वाढतोय, पण सरकारला गांभीर्य नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्या सक्रीय रुग्णांची संख्या अधिक असून अनेकांचा मृत्यू होत आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी, हे सरकार गंभीर नसल्याचे टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (NCP Leader Ajit Pawar Slams Shinde Fadnavis Government Due To Corona Increased In Maharashtra)

“अनेक संस्था या कोरोनाच्या रुग्णवाढीला आळा घालण्यासाठी काम करत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन काम करावे. मागील काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोरोनाला सामोरे गेलो होतो. केंद्रीय आरोग्यमंत्री हे डॉ. हर्षवर्धन होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपर्क सुरू होता. त्यांच्या सुचनेनुसार आम्ही अंमलबजावणी करत होतो. परंतु, राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र तरीही गांभिर्याने सर्वांनी घेतले पाहिजे तसे गांभीर्य घेतले जात नाही. जर वाढत्या रुग्णांचे गांभीर्य जास्त असेल तर सरकारने सांगितले पाहिजे”, असे अजित पवार म्हणाले.

“यासंदर्भात सरकारी कार्यलयात ज्या यंत्रणा काम करत आहेत, त्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. नागरिकांनीही मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र अद्याप तसे आदेश काढण्यात आलेले नाहीत. सरकारमधील आणि मंत्रिमडळातील अनेकजण मास्क वापरताना दिसत नाहीत. याचाच अर्थ जनतेला या कोरोनाचे गांभीर्य वाटत नाही”, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांची सरकारना ‘ही’ विनंती

“वाढत्या कोरोनामुळे अनेकजण मृत्यूच्य जाळ्यात सापडत असल्याचा बातम्या समोर येत आहेत. माझी सरकारला विनंती आहे. मला सरकारला निर्वाणीने सांगायचे की, ही गोष्ट गांभिर्याने घ्यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी हे गांभीर्याने घेऊन जनतेला दिलासा द्यावा. पत्रकार परिषद घेऊनही काही माहिती दिल्यास, लोकांना वस्तुस्थिती समजेल आणि काय खबरदारी व काळजी घ्यायला पाहिजे हे समजेल. त्यामुळे सरकारने ताबडतोब लक्षात घ्यावी ही माझी विनंती राहील”, असेही अजित पवार म्हणाले.


हेही वाचा – सूर्य पश्चिमेकडून उगवला तरी…, मोहित कम्बोज यांचे सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर

First Published on: April 7, 2023 1:54 PM
Exit mobile version