एकाच दगडात दोन पक्षी! रिक्षा चालकाच्या लॉटरीवरून अमोल मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

एकाच दगडात दोन पक्षी! रिक्षा चालकाच्या लॉटरीवरून अमोल मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

केरळमधील अनूप बी या तीस वर्षीय रिक्षा चालकाचा लॉटरी लागली आहे. शनिवारी या रिक्षा चालकाने लॉटरीचे तिकीट काढले होते. रविवारी या रिक्षाचालकाला 25 कोटी रुपयांची बंपर लॉटरी लागली आहे. अनूप बीच्या या रिक्षा चालकाला लागलेल्या लॉटरी लागल्यानंतर “सध्याच्या घडीला ऑटो चालकांना चांगले दिवस आले आहेत”, असे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले. दरम्यान, मिटकरी यांनी नाव न घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणला आहे. (NCP leader amol mitkari slams cm Eknath Shinde on auto rickshaw 25 crore lottery)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी रिक्षाचालक होते. ठाण्यात रिक्षाचालवत असताना त्यांनी कालांतराने शिवसेनेचा प्रचार करत त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. त्यानंतर आता शिवसेनेशी बंडखोरी करत राज्यात भाजपाशी युती करून सरकार स्थापन केले. शिंदेंच्या बंडखोरीमुळे मागील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून भाजपा आणि शिंदे गटावर टीका केली जात आहे.

“सध्याच्या घडीला ऑटो चालकांना चांगले दिवस आले आहेत. त्याचे हे ज्वलंत उदाहरण एका ऑटो चालकाला 25 खोक्यांची “ओक्के” लॉटरी लागली”, असे ट्विट करत मिटकरी यांनी टोला हाणला आहे.

याआधीही राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही विरोधकांनी रिक्षा चालकाचा मुद्दा उपस्थित करून शिंदेंवर टीका केली होती.


हेही वाचा – ऑटो चालकाचे एका रात्रीत नशीब बदलले, कर्ज घेऊन मलेशियाला जाणार तेवढ्यात लागली २५ कोटींची लॉटरी

First Published on: September 19, 2022 5:46 PM
Exit mobile version