Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग ऑटो चालकाचे एका रात्रीत नशीब बदलले, कर्ज घेऊन मलेशियाला जाणार तेवढ्यात लागली...

ऑटो चालकाचे एका रात्रीत नशीब बदलले, कर्ज घेऊन मलेशियाला जाणार तेवढ्यात लागली २५ कोटींची लॉटरी

Subscribe

लॉटरी जिंकणारा ऑटोचालक अनुप हा श्रीवरहमचा रहिवासी आहे. शनिवारी त्याने TJ 750605 क्रमांकाचे तिकीट घेतले होते, ज्यामुळे त्यांचे नशीब पालटले

नवी दिल्लीः देव जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो, असे म्हणतात. असाच प्रकार केरळमधील एका ऑटोचालकासोबत घडला आहे, रविवारच्या आदल्या दिवशीपर्यंत त्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे त्याने मलेशियामध्ये शेफच्या नोकरीसाठी बँकेकडे तीन लाखांच्या कर्जाची मागणी केली होती. मात्र कर्ज मंजूर झाल्यानंतर एका दिवसात त्याला 25 कोटींची लॉटरी लागली.

दुसरे तिकीट घेताच नशीब पालटले

लॉटरी जिंकणारा ऑटोचालक अनुप हा श्रीवरहमचा रहिवासी आहे. शनिवारी त्याने TJ 750605 क्रमांकाचे तिकीट घेतले होते, ज्यामुळे त्यांचे नशीब पालटले. मीडियाशी बोलताना अनुप म्हणाला की, आधी त्याने एक तिकीट खरेदी केले होते, जे त्याला लागले नव्हते, त्यानंतर त्याने दुसरे खरेदी केले, ज्यामुळे लॉटरी लागली.

बँकेने कर्ज घेण्यास नकार दिला

- Advertisement -

त्याने सांगितले की, नंतर बँकेतून कर्जाबाबत फोन आला. मी म्हणालो की, मला आता त्याची गरज नाही. मी मलेशियालाही जाणार नाही. मिळालेल्या पैशातून कर कपात केल्यानंतर अनुप सुमारे 15 कोटी रुपयांमध्ये घर घेणार आहे. अनुपने सांगितले की, गेल्या 22 वर्षांपासून तो लॉटरीची तिकिटे खरेदी करत आहे. त्याने शेकडो तिकिटांमध्ये सुमारे 5000 रुपये जिंकले आहेत.

अनुप पुढे म्हणाला की, मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती, मी टीव्हीवर लॉटरीचा निकाल पाहिला नव्हता. मात्र, मी माझा फोन तपासला तेव्हा मी लॉटरी जिंकल्याचे दिसले. माझा विश्वास बसेना आणि माझ्या पत्नीला दाखवले. तिने खातरजमा केल्यानंतर मी लॉटरी जिंकल्याचे मला समजले.

कुटुंबासाठी नवीन प्रशस्त घर बांधणार

- Advertisement -

जेव्हा अनुपला विचारण्यात आले की, एवढ्या पैशाचे तो काय करणार, तेव्हा त्याने उत्तर दिले की, आपले पहिले प्राधान्य आपल्या कुटुंबासाठी घर बांधणे आणि त्याचे थकित कर्ज फेडणे आहे. याशिवाय अनुपने सांगितले की, तो त्याच्या नातेवाईकांना मदत करेल, काही धर्मादाय काम करेल आणि केरळमध्ये हॉटेल क्षेत्रात काहीतरी सुरू करेल.


हेही वाचाः चंदीगड युनिव्हर्सिटी व्हिडीओ कांडप्रकरणी विद्यार्थी पुन्हा आक्रमक; युनिव्हर्सिटी 6 दिवस बंद

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -