धनंजय मुंडेंनी नकोशीचे पालकत्व स्वीकारले

धनंजय मुंडेंनी नकोशीचे पालकत्व स्वीकारले

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

देशभरात आजही अनेक भागांमध्ये स्त्री – भ्रुण हत्येसारखे प्रकार घडत आहेत. या गोष्टींवर आळा घालण्यासाठी राज्यात आणि केंद्र सरकारने अनेक कठोर कायदे केले आहेत. मात्र, तरीही अनेकदा मुलगी नकोशी झाली का त्या मुलीला आई – वडिल सोडून जातात किंवा तिची हत्या करतात. अशा घटनांमध्ये बऱ्याचदा बाळाला आपले प्राण गमवावे लागते. तर बऱ्याचदा त्यांचे प्राण वाचते. दरम्यान, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

नेमके काय घडले?

रेल्वे – ट्रॅकजवळ काटेरी झुडुपात मुलीला सोडून कोणीतरी पळ काढला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना ही गोष्ट समजताच. त्यांनी तात्काळ या मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केले. इतकेच नाहीतर धनंजय मुंडेनी या मुलीचे पालकत्व स्वीकारले असून तिच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी स्वीकारली आहे. तसेच या मुलीचे मुंडेनी शिवकन्या असे नाव देखील ठेवले आहे.


मुंडेंनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक

धनंजय मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी या मुलीच्या उपचाराची सर्व सोय केली असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजत आहे. तसेच सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून धनंजय मुंडेंनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक देखील केले जात आहे.


हेही वाचा – पुत्रप्राप्ती आणि गुप्तधनाच्या बहाण्याने पाच बहिणींवर भोंदूबाबाने केला लैंगिक अत्याचार


 

First Published on: February 25, 2020 4:49 PM
Exit mobile version