घरमहाराष्ट्रपुत्रप्राप्ती आणि गुप्तधनाच्या बहाण्याने पाच बहिणींवर भोंदूबाबाने केला लैंगिक अत्याचार

पुत्रप्राप्ती आणि गुप्तधनाच्या बहाण्याने पाच बहिणींवर भोंदूबाबाने केला लैंगिक अत्याचार

Subscribe

पुत्रप्राप्ती होण्यासाठी तसेच घरात असलेले गुप्तधन काढून देण्याचे आमिश दाखवून एकाच कुटुंबातील पाच बहीणींवर एका भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये आढळून आला आहे.

पुत्रप्राप्ती होण्यासाठी तसेच घरात असलेले गुप्तधन काढून देण्याचे आमिश दाखवून एकाच कुटुंबातील पाच बहीणींवर एका भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अघोरी भोंदूबाबाला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील खैरेवाडी येथे राहणारा सोमनाथ कैलास चव्हाण असे या आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा सोमनाथ याने पीडित महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, ‘तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये, यासाठी तुमच्याच नात्यातील एका बाईने घरातील प्रत्येक सदस्यावर करणी केली आहे. तुमच्या घराच्या एका खोलीत सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन आहे. तसेच घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे’. अशी धमकी भोंदूबाबाने दिली.

पुत्रप्राप्ती आणि गुप्तधनासाठी विचीत्र उपाय 

पुत्रप्राप्ती व्हावी, गुप्तधन मिळावे आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरात तीन उतारे व नग्नपूजा करावी लागेल, असा उपाय भोंदूबाबाने सांगितला. तसेच या पूजेसाठी तीन लाख रुपये खर्च येईल. माझी ११ हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल. हे तीन उतारे १५ दिवसात सुरू केले नाहीत तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवाला मोठा धोका असल्याची भीती देखील आरोपी भोंदूबाबाने दाखवली होती. पीडित महिलेच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळून पीडित महिलेसह तिच्या पाच बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले. खोलीचे दार बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. सर्व बहिणींना बाहेर जाताना झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास ‘तुझ्या आई-वडिलांना माझ्या दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेच्या एका बहिणीसोबत उतारा काढण्याच्या बहाण्याने तीन वेळा लैंगिक अत्याचार केला.

- Advertisement -

अधिनियमान्वये गुन्हा दाखल

तसेच पीडितेच्या एका बहिणीचे लग्न झालेले असताना देखील तिच्याशी पुन्हा लग्न केले. याबाबत पीडितेने पिंपरी पोलिस धाव घेत फिर्याद दिली असून, भोंदूबाबावर भारतीय दंड विधान कलम ३५४, ३५४ (अ), ३७६, ३७६ (१) (अ), ३७६ (३), ३७६ (अ ब), ४९४, ४९६, पोक्सो, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -