ईडीच्या नोटीशीमुळे कोहिनूर टॉवर लगेच हालायला लागला, भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

ईडीच्या नोटीशीमुळे कोहिनूर टॉवर लगेच हालायला लागला, भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

ईडीच्या नोटीशीमुळे कोहिनूर टॉवर लगेच हालायला लागला, भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पडावा मेळाव्यात संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर घणाघात केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीयवाद सुरु झाला असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरसुद्धा राज ठाकरेंनी टीकास्त्र डागलं आहे. यावर भुजबळांनी गुढी पाडव्याचा मेळावा होता की, भाजपचा मेळावा होता हे कळायला मार्ग नाही असा खोचक टोला लगावला आहे. एका ईडीच्या नोटीशीमुळे इंजिन लगेच यू-टर्न घेतला तर कोहिनूर टॉवरसुद्धा हालायला लागला आहे अशा शब्दात राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत म्हणाले की, दोन वर्ष तुरुंगात राहिलेल्या भुजबळांना मंत्रिपद देण्यात आले ते काही स्वातंत्र्य सेनानी होते का? असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. यावर भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ म्हणाले की, यापूर्वी राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. परंतु अचानक त्यांनी यु-टर्न घेतला आहे. भाजपची सभा असल्याचे वाटत होते. राज ठाकरेंनी माझ्याविरोधात मंत्रिपदावरुन टीका केली, मी दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आलो परंतु मोदींविरोधात टीका करण्याचे सोडले नाही. यामुळे राष्ट्रवादीने बक्षीस म्हणून शपथविधीला पाचारण केले अशा शब्दात भुजबळांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजपची बी टीम म्हणून काम करायचे आहे का?

भुजबळ पुढे म्हणाले की, राज ठाकरेंचे काही कळत नाही. ईडीमध्ये बोलवल्यानंतर इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेले. कोहिनूर टॉवर एकदम हालायला लागला आहे. राज ठाकरेंना भाजपची बी टीम म्हणून काम करायचे असेल तर तसं त्यांनी जाहीर करावे, अशा प्रकारे आडमार्गाने टीका करण्यात काही अर्थ नाही असे छगन भुजबळ म्हणाले.

राज ठाकरेंनी प्रांतवाद वाढवला

राष्ट्रवादीमुळे जातीवाद वाढला असल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. यावर भुजबळ म्हणाले की, जातीवाद, धर्मवाद कोणी वाढवला याचा हिशोब मोठा होईल. राज ठाकरेंनी प्रांतवाद वाढवला आहे. कल्याणमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या युपीच्या लोकांना कोणी पळवले, केवळ उत्तम बोलता म्हणून लोकं तुम्हाला ऐकायला येतात. त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळत नाही पक्षाचे इंजिन कोणत्या दिशेला आहे. उत्तरेला की पूर्वेला? तसेच तुमच्या पक्षाचे किती आमदार, खासदार आणि नगरसेवक आहेत? असे सवाल करत भुजबळांनी मनसेवर घणाघात केला आहे.


हेही वाचा : नाशिक-पवन एक्सप्रेसचे 4 डब्बे रुळावरून घसरले, एक्सप्रेसमधील काही प्रवाशी जखमी

First Published on: April 3, 2022 5:50 PM
Exit mobile version