राजकारणात आता ‘या’ नेत्याच्या मुलाची एन्ट्री

राजकारणात आता ‘या’ नेत्याच्या मुलाची एन्ट्री

मागील काही काळात राज्याच्या राजकारणात अनेक बड्या नेत्यांच्या मुलांनी एन्ट्री घेतली आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलानेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. जयंत पाटील यांच्या मुलाचे नाव प्रतीक पाटील आहे. प्रतिक यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. (ncp leader jayant patil son pratik patik win rajaram sugar factory)

प्रतिक पाटील यांचा हा विजय म्हणजेच प्रतीक पाटील यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे. लोकनेते राजारामबापू पाटील हे वाळवा सहकारी साखर कारखाना स्थापनेच्या वेळी संचालक होते. दरम्यान, राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर वाळवा सहकारी साखर कारखान्याचे नामांतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना असे करण्यात आले.

राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून झाला होता. त्यानंतर 10 वर्षे ते अध्यक्ष राहीले. येत्या काळात कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होणार असल्यची चर्चा आहे.

आमदार जयंत पाटील यांनी नव्या पिढीला संधी देताना चिरंजीव प्रतिक पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून केला आहे.

प्रतीक पाटील यांचा अलीकडेच शाही विवाहसोहळा पार पडला होता. या शाही विवाहाची राज्यभर एकच चर्चा झाली होती. या विवाह सोहळ्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता प्रतीक पाटलांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.


हेही वाचा – Viral Video : साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, ‘असं कुणीच…’

First Published on: February 6, 2023 7:58 PM
Exit mobile version