‘मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही…’, चार्ल्स डार्विनचा धडा पुस्तकातून काढल्याने आव्हाडांची भाजपावर टीका

‘मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही…’, चार्ल्स डार्विनचा धडा पुस्तकातून काढल्याने आव्हाडांची भाजपावर टीका

जितेंद्र आव्हाड

‘चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. त्याचे कारण देताना मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही असे काहीसे शब्द त्यामध्ये दिसतात’, अशा शब्दांता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर निशाणा साधला आहे. शिवाय, योगी सरकारच्या निर्णयाविरोधात शास्त्रज्ञ, विज्ञान शिक्षक आणि इतर शिक्षक पुढे आल्याने आव्हाडांनी त्यांचे कौतुक केले आहे. (NCP Leader Jitendra Awhad Slams BJP Due To Remove Charles Darwin Subject From Syllabus In UP By Cm Yogi Adityanath)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मौलाना आझाद, महात्मा गांधी यांचे धडे पुस्तकातून काढून टाकण्यात आले. अशातच आता NCERT ने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा चार्ल्स डार्विन सुद्धा काढण्यात आला. युपी सरकारच्या या निर्णयावरून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. त्याचे कारण देताना मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही असे काहीसे शब्द त्यामध्ये दिसतात. जे झाले ते दैविक होतं. याकडे वैज्ञानिक बुद्धीने बघू नका. म्हणजे बुद्धीप्रामाण्य वाद हा आता संपल्यात जमा. म्हणजे आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला आला हे सिद्धांत आता यापुढे आपल्याला मान्य करावे लागतील”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शिवाय, “ह्या बदल आम्हाला मान्य नाही असे पत्रक देश भरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे. विरोध केला जातोय हे कौतूकास्पद आहे”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांचा संभाजी भिडेंवर निशाणा

विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी या ट्वीटमधून श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावरही निशाणा साधला आहे. संभाजी भिडे यांच्या ‘स्त्री – पुरुषांनी हा आंबा खाल्ल्यास त्यांना नक्की मुलं होतील’, या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. “बुद्धीप्रामाण्य वाद हा आता संपल्यात जमा. म्हणजे आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला आला हे सिद्धांत आता यापुढे आपल्याला मान्य करावे लागतील”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले होते संभाजी भिडे?

“लग्न होऊन १५ वर्ष जोडप्यांना मूल होत नाही. अशा स्त्री – पुरुषांनी हा आंबा खाल्ल्यास त्यांना नक्की मुलं होतील. आतापर्यंत मी १८० पेक्षा अधिक लोकांना हा आंबा खायला दिला असून त्यापैकी १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे”, असे संभाजी भिडे म्हणाले.


हेही वाचा – ‘…तिने काय-काय लफडी’, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंनी ठोकला 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

First Published on: April 27, 2023 9:25 PM
Exit mobile version