राजकारणात फटकेबाजी करणाऱ्या रोहित पवारांची मैदानात जोरदार बॅटिंग

राजकारणात फटकेबाजी करणाऱ्या रोहित पवारांची मैदानात जोरदार बॅटिंग

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फलंदाजी केली आहे. रोहित पवार सध्या साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, केएसडी शानबाग विद्यालयाला भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांनी विद्यालयातील मुलांचा सत्कार केला. तसेच सत्कारानंतर त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह करण्यात आला. या आग्रहामुळे रोहित पवार यांनी आपली बॅटींग किती भारी आहे हे दाखवुन दिले. (ncp mla and mca president rohit pawar played fanstastic cricket shot in satara)

रोहित पवार यांची नुकताच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आज त्यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आग्रहानंतर रोहित पवार यांनी पायाला पॅड लावत फलंदाजी केली. त्यावेळी रोहित पवारांनी प्रत्येक बॉलवर जोरदार फटका मारले. तसेच, त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर झालेली निवड कशी योग्य आहे, हे दाखवून दिले.

दरम्यान, रोहित पवार यांची एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोलेबाजी कली होती. “पवार कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी कुस्ती खेळली? अजितदादा कबड्डीचे अध्यक्ष त्यांनी कबड्डी खेळली का? सुप्रिया सुळे खो-खो अध्यक्ष होत्या, त्या कधी खेळल्या का? रोहित पवार क्रिकेटचा अध्यक्ष, त्याला क्रिकेट खेळता येतं का? रोहित पवार यांना एक मॅच खेळायला लावा, 5-10 रन केले तर, ठेवा”, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर हल्लाबोल केला होता.

एमसीएच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला फारशी साथ मिळाली नाही. या निवडणुकीत रोहित पवारांनी एकतर्फी बाजी मारली. शंतनु सुगवेकर आणि घटनादुरुस्तीसाठी पाठपुरावा करणारे अभिषेक बोके दोघेही रोहित पवारांपासून खूप दूर राहिले. या निवडणूकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापासून क्रीडा क्षेत्रातही आपले निर्विवाद वर्चस्व राखणारे शरद पवार यांचे दोन नातू या निवडणूकीच्या रिंगणात होते. रोहित पवार आणि शरद पवारांचे भाचे जावई विक्रम बोके यांचा मुलगा अभिषेक हे यावेळी एकमेकांविरुद्ध उभे होते. मात्र, अभिषेक बोके या निवडणूकीत फारच फिके पडले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची यापूर्वीची निवडणूक बेकायदेशी असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. पण, या निकालापूर्वीच नवी निवडणूक देखील पार पडली.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं तुफान भाषण, आरोग्य शिबिरात बंडखोरांवर निशाणा

First Published on: January 26, 2023 3:06 PM
Exit mobile version