घरठाणेमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं तुफान भाषण, आरोग्य शिबिरात बंडखोरांवर निशाणा

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं तुफान भाषण, आरोग्य शिबिरात बंडखोरांवर निशाणा

Subscribe

ठाणे – शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आज ठाकरे पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु, मी आज येथे आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी आलो असल्याने राजकीय भाषण करणार नाही, असं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. येत्या काळात येथे येऊन राजकीय नेत्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला नक्की येणार, असा मिश्किल टोला त्यांनी एकनाथ शिंदेंवर लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज मी फक्त आरोग्य शिबिरासाठी आलो आहे. खासदार राजन विचारे यांनी बोलावलं म्हणून आलो. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला येथे आलो. पण, येत्या काही दिवसांत ठाण्यातील राजकीय नेत्यांची आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे, असं ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राजकारणात जो काही विकृतपणा आणि गलिच्छपणा आलेला आहे तो समोर दिसत असताना देखील शिवेसना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही याचा मला अभिमान आहे. अन्यायाला लाथ मारायची असं बाळासाहेबांनी शिकवलं आहे. त्यांचीच शिकवण आहे की ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण करायचं. या ८० टक्के समाजसेवेला राजन यांनी सुरुवात केली आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राजन विचारे आणि त्यांच्यासह येथे अनेक शिवसैनिक उपस्थित आहेत. काहीजण विकले गेले. काय भावाने विकले गेले हे सांगायची गरज नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हणताच तिथे ५० खोकेंच्या घोषणांनी परिसर दणाणला गेला. यावरून उद्धव ठाकरेंनी एक किस्सा उपस्थितांशी शेअर केला.

- Advertisement -

ते म्हणाले की, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. गेल्या आठवड्यात संजय राऊत तिकडे गेले होते. संजय राऊत तिकडून आल्यानंतर मला म्हणाले की, काश्मीरमध्येही या घोषणा आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात या घोषणा गेल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राची बदनमी झाली आहे.

ठाकरे पुढे म्हणाले की, लांडगे घुसले होते ते विकले गेले. शिवसेनेचे बदनामी झाली. गेले ते जाऊद्या, त्यांच्याबद्दल दुख व्यक्त करण्यात अर्थ नाही. आपल्यातलेच हे निखारे उद्या राजकारणात मशाल पेटतील.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -