राष्ट्रवादी नेत्यांच्या राजभवनावरील सदिच्छा भेटी वाढल्या, चर्चा तर होणारच

राष्ट्रवादी नेत्यांच्या राजभवनावरील सदिच्छा भेटी वाढल्या, चर्चा तर होणारच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळे यांनी २ मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर सदिच्छा भेट घेतली. आठवड्याभरातनंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे संकटमोचक समजले जाणारे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी १० मे रोजी राज्यपाल कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.

मुंबई महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळताना आतापर्यंत राज्याकडून केंद्राकडे असणारा टीकेचा सूर ओसरल्याचे वातावरण गेल्या काही दिवसांपासून अनुभवायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला दिलेला मदतीचा ओघ पाहता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाने कोविड परिस्थिती हाताळल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे केलेले कौतुकाने महाविकास आघाडी खूश आहे. पण दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन खासदारांनी आठवड्याभरात राज्यपालांच्या घेतलेल्या सदिच्छा भेटींमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 2 मे रोजी तर त्यापाठोपाठच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी 10 मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही भेटींचे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. राज्यपालांसोबत राष्ट्रवादीच्या खासदारांच्या भेटींमुळे नक्की महाविकास आघाडीत काय शिजतंय या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून या भेटी वादळापूर्वीच्या आहेत का. असा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या १० दिवसांत राष्ट्रवादीच्या २ खासदारांनी राज्यापालांची भेट घेतली असल्यामुळे चर्चा तर होणारचं.

 


 

First Published on: May 10, 2021 9:26 PM
Exit mobile version