खतांच्या वाढलेल्या किंमतीवरुन शरद पवाराचं केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना पत्र

खतांच्या वाढलेल्या किंमतीवरुन शरद पवाराचं केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना पत्र

खतांच्या वाढलेल्या किंमतींवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिलं आहे. खतांच्या किंमती कमी करा, अशी मागणी शरद पवारांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं आधीच नुकसान झालेलं आहे. त्यामुळे वाढीव खतांच्या किंमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत, असं शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

आधीच समाज त्रासलेला असताना मदत करण्याऐवजी केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय दिला आहे. लॉकडाऊनमुळे मार्केटींग व्यवस्थेला फटका बसला आहे. मान्सून अगदी जवळ आला आहे, दुर्दैवाने घेतलेल्या निर्णयामुळे पेरणीपूर्वी होणाऱ्या शेतीविषयक कामकाजावर थेट परिणाम होईल आणि भविष्यात पिकांच्या उत्पादन खर्च व उत्पादकतेवर परिणाम होईल, असं शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

इंधन दरवाढ असताना खतांच्या किंमती वाढवल्याने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळल्या सारखं आहे. सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक असून त्वरित मागे घ्यावा, अशी विनंती करत शरद पवार यांनी रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांना या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्यास सांगितलं आहे. शेतकऱ्यांना दिलासा दिल्यास कौतुकच असेल, असं शरद पवार यांनी म्हटलं.

First Published on: May 18, 2021 3:26 PM
Exit mobile version