भाजपाचा पराभव राष्ट्रवादी करणार – अजित पवार

भाजपाचा पराभव राष्ट्रवादी करणार – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

आज दिवसभरात तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभांचे निकाल समोर आले असून, भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, या निकालाविषयी आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘येणाऱ्या काळात मोदी, भाजप आणि शिवसेना यांचा पराभव करायचा हे एकच ध्येय असले पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पराभवाचं माध्यम ठरला पाहिजे’, असं आवाहन राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. ‘चला देऊया मदतीचा हात’ या राष्ट्रवादीच्या विशेष कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. आपल्यासमोर एकच ध्येय असलं पाहिजे की, भाजपाचा दारुन पराभव करत आपल्या विचाराचं सरकार आणायचं आहे. त्यामुळे पक्षाला अधिक वेळ दया, मागे राहू नका, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षासाठी झोकून दया, असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला. ताकदीने काम करुन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून आणा’, असे आवाहनही पवार यांनी केले.


वाचा: लोकसभेत मात्र ‘भाजप’ येणार – रावसाहेब दानवे



काहीवेळा पक्षाला काही जागा सोडाव्या लागतील त्यावेळी नाराज न होता येत्या काळात सत्ता आणावयाची आहे हे लक्षात ठेवा. जो त्याग करेल त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल असेही स्पष्ट केले. पवार यांनी भाजप सरकार आणि मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा कारभार भाजपाचा सुरु आहे. देशात अराजकता आणि हुकुमशाही सुरु आहे. सत्तेचा दुरुपयोग माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही इतका दुरुपयोग भाजप सरकारने केला आहे.त्यामुळे केंद्रात आणि राज्या आणावयाची आहे ही खूणगाठ बांधावयाची आहे, असे आवाहनही पवार यांनी केले.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्षणाची वेगवेगळी कवाडं उघडण्याचं काम केले.ज्या ज्या वेळी चांदयापासून बांदयापर्यंत महाराष्ट्र अडचणीत आला त्या त्या वेळी शरद पवार यांनी मदतीला धावून आले आहेत. वेगवेगळया घटकांना सोबत घेवून जाण्याचे विचार शरद पवार यांनी आपल्याला दिले असल्याचे पवार यांनी सांगितले. 

First Published on: December 11, 2018 6:44 PM
Exit mobile version