Covid-19: महाराष्ट्राबाहेर जायचं प्लान आहे! ‘या’ ११ राज्यात No Entry

Covid-19: महाराष्ट्राबाहेर जायचं प्लान आहे! ‘या’ ११ राज्यात No Entry

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्राबाहेर जाताना आता काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुठेही राज्याबाहेर प्रवास करायचा असल्यास तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहे. तुमचा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल तर तुम्हाला दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांसह जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात तुम्हाला प्रवेश मिळेल अन्यथा या राज्यात तुम्हाला No Entry असेल.

गेल्या दोन दिवसांपूर्वी दिल्ली सरकारने खबरदारीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह RT-PCR दाखवणे गरजेचे असणार आहेत. २६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे. त्यामुळे दिल्ली सरकारनेही महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि पंजाबमधील प्रवाशांना दिल्लीत एन्ट्री करण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक केला आहे. दिल्लीमध्ये फ्लाइट्स, ट्रेन आणि बसमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटि्व्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच, मध्यप्रदेशात प्रवेश करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक असणार आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह नसेल तर मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाही. महाराष्ट्रात विशेषत: नागपूरमध्ये रुग्णवाढ अधिक झाल्याने मध्यप्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम बंगलामध्ये बुधवारपासून राज्यात यायचे असेल तर कोरोनाचे निगेटिव्ह सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट नसेल तर महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि तेलंगनाहून विमानाने येणाऱ्या प्रवाशांना पश्चिम बंगालमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम २७ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे.

कर्नाटक सरकारनेही या पूर्वीच महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना राज्य बंदी केली आहे. तर उत्तराखंड राज्याच्या बॉर्डर, रेल्वे स्थानके, डेहराडून विमानतळावर कोरोना टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तपासणीसाठी डॉक्टरांची मोठी टीम तैनात करण्यात आल्याचीही माहिती मिळतेय. यासह श्रीनगरमध्ये देशातील कोणत्याही राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली असून मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरात जाण्यासाठीही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक करण्यात आले आहे.


First Published on: February 26, 2021 2:41 PM
Exit mobile version