Neil Somaiya: नील सोमय्यांकडून अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात दाखल केलेली याचिका अखेर मागे

Neil Somaiya: नील सोमय्यांकडून अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात दाखल केलेली याचिका अखेर मागे

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर नील सोमय्यांनी दिलासा मागत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच सोमय्या यांच्याविरोधात सध्या कोणत्याही प्रकारची चौकशी करत नसल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा केला होता. नील सोमय्यांनी पीएमसी बँकेचे पैसे आपल्या प्रकल्पात वापरले असून बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे असे म्हटले होते. यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

निकॉन इन्फ्राच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नील सोमय्या यांनी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, आम्ही कुठल्याही न्यायालयात जाणार नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.


हेही वाचा : UP Election Result Analysis: यूपीमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं, ‘या’ सहा फॅक्टरचा मोठा फायदा


 

First Published on: March 10, 2022 4:28 PM
Exit mobile version